करोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ –Corona Vaccines

Good News! करोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ –Corona Vaccines

संपूर्ण जगाचे कान जी बातमी ऐकण्यासाठी आसुसलेले होते… अखेर ती आनंदवार्ता आली आहे. करोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती.

जगाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. करोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस करोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.

जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते

See also चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 22 March 2022 / Talathi MPSC POLICE BHARTI

Leave a Comment